¡Sorpréndeme!

प्रदूषणापासून बचावासाठी नोझ फिल्टर, किंमत फक्त १० रूपये | Lokmat Latest Update | Lokmat News

2021-09-13 0 Dailymotion

आयआयटीतील विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी मिळून एक नोझल फिल्टर विकसित केले आहे. या फिल्टरची किंमत अवघी १० रूपये असल्याने सामान्यांनाही ते परवडू शकेल. आयआयटी आणि नॅनोक्लीन ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड यांनी संयुक्तपणे तयार केलेल्या या फिल्टरमुळे हवेतील प्रदूषित घटक शरीरात जाणार नाहीत. सध्या हे नोझल फिल्टर केवळ ऑनलाईन विक्रीसाठीच उपलब्ध असेल. या नोझल फिल्टरचा वापर करणेही सोपे आहे. बाहेर जाण्यापूर्वी दोन्ही नाकपुड्यांमध्ये हे फिल्टर लावल्यास हवेतील प्रदुषित घटक शरीरात जात नाहीत. नाकाला याचा विशेष त्रासही जाणवत नाही.असे नॅनोक्लीन ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेडचे सीईओ प्रतिक शर्मा यांनी दिली.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews